Marathi
श्रीमद्भगवद्गीता अध्याय 8 श्लोक 4
अक्षरब्रह्मयोग · श्लोक 4
श्लोक 4
अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् |
अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर ||८-४||
अनुवाद
उत्पत्ती-विनाश असलेले सर्व पदार्थ अधिभूत आहेत. हिरण्यमय पुरुष अधिदैव आहे आणि हे देहधाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, या शरीरात मी वासुदेवच अंतर्यामी रूपाने अधियज्ञ आहे. ॥ ८-४ ॥